अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे घेतल्यानंतर विधानसभेत आज, शुक्रवारी उर्वरित 10 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी निलंबन मागे घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली. भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संग्राम जगताप, राहुल जगताप, अमर काळे, विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सकपाळ, कुणाल पाटील, जयकुमार गोरे अशी निलंबन मागे घेतलेल्या आमदारांची नावे आहेत. निलंबन मागे घेतल्यानंतर गिरीश बापट यांनी सर्व आमदारांना कामकाजात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
COMMENTS