विधिमंडळाच्या इतिहासात आज “जे” झालं “तसं” कधीच झालं नाही!

विधिमंडळाच्या इतिहासात आज “जे” झालं “तसं” कधीच झालं नाही!

मुंबई – विविध मुद्यावरुन विधीमंडळात दररोज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान सुरू असतं. त्यात विरोधक अनेकवेळा सभात्याग करतात, कामकाजावर बहिष्कार घालातात. असं चित्र आपण नेहमी पाहतो. 

विधिमंडळात आज असा प्रकार झाला. तो इतिहासात यापुर्वी कधीही झाला नव्हता. विरोधी पक्षांच्या ऐवजी सत्ताधारी पक्षांनीच कामकाजावर बहिष्कार टाकला. विधान परिषदेचं कामकाज आज सुरू होतं. त्यावेळी विविध प्रश्नावरुन विरोधक सरकराला अडचणीत आणत होते. त्यातचं विधान परिषदेत विरोधकांचं संख्याबळही जास्त आहे. त्यामुळे अखेर सत्ताधारी भाजपनं कामकाजावर बहिष्कार टाकला आणि ते बाहेर पडले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप सत्ताधा-यांनी केला. याबाबतच निवेदननही त्यांनी सभापती आणि उपसभापतींना दिलं आहे. सगळे नियम मोडून काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते गोंधळ घालत असल्याचा आरोपही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला. भाजपनं सभात्याग केल्यावर शिवसेनेनंही कामकाजावर बहिष्कार टाकला.

COMMENTS