दिग्‍विजय सिंह यांना मोठा धक्का, पक्षाने केली प्रभारी पदावरुन हाकलपट्टी

दिग्‍विजय सिंह यांना मोठा धक्का, पक्षाने केली प्रभारी पदावरुन हाकलपट्टी

काँग्रेसने पक्षाचे वरीष्‍ठ दिग्‍विजय सिंह यांना मोठा धक्‍का दिला आहे. त्‍यांना तेलंगणाच्‍या प्रभारी पदावरुन हटवले आहे. आता याजागी नव्‍या टीमला राज्‍यात नियुक्‍त करण्‍यात आले आहे. या टीमचा प्रभार आरसी कुंठिया यांना दिला जाईल. या वृत्ताची पुष्‍टी AICCचे सेक्रेटरी जनार्दन द्‍विवेदी यांनी केली आहे. 

तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असल्‍याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी तेलंगाणा पोलिसांवर केला होता. यानंतर सिंह यांना कर्नाटक आणि गोव्‍याच्‍या निवडणूक प्रभारी पदावरुन हटवण्‍यात आले होते. काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी तेलंगाणामध्‍ये नवी टीम नियुक्‍त केली आहे. या टीमकडे आता ही जबाबदारी सोपवण्‍यात येणार आहे. या टीमचे नेतृत्‍व आरसी कुंठिया करणार असून सतीश जकोली यांना सेक्रेटरी पद दिले जाणार आहे.

 

COMMENTS