विधीमंडळ कामकाजाचे Live updates…

विधीमंडळ कामकाजाचे Live updates…

विधानपरिषद – गिरीश बापट यांची सभागृहात विनंती, सभागृह सुरु रहावे, कामकाज विरोधकांनी चालवावे, निलंबन वगैरे विषयांवर आम्ही चर्चेला तयार आहोत, विरोधकांनी सहकार्य करावे

# काँग्रेस गटनेते शरद रणपिसे – सरकार बहुमतमध्ये आहे म्हणून रेटून कामकाज करत आहेत, कामकाज चालावे ही सरकार ची जवाबदारी आहे, मात्र सरकारला विरोधका नसले तरी चालतील असे वाटते, शेतकरी कर्जमाफी शिवाय परिषदमध्ये कामकाज अजिबात चालु देणार नाही

# हेमंत टकले – शेतकरीबाबत आज सरकारची जाहिरात आली आहे, नेमक्या संघर्ष यात्रा सुरु होतांना या जाहिराती दिल्या गेल्या आहेत.

# सरकारवर ही वेळ का आली, अजूनही वेळ गेली नाही , कर्ज माफी जाहीर करा, निलंबन मागे घ्या – शेकाप जयंत पाटील

# संजय दत्त -मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वे च्या टोलचे पैसे वाढणार असे समजते, सरकार एकीकडे टोलमुक्त करणार म्हणते, याबाबत सरकारने उत्तर द्यावे.

# चंद्रकांत पाटील – हा विषय एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहे, मी त्यांच्याशी चर्चा करतो माहिती घेतो आणि सभागृहात माहिती देतो.

# विधानपरिषद सदस्यांची विधीमंडळ  पाय-यांवर घोषणाबाजी…कर्जमाफी झालीच पाहिजे

# मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – 31 लाख शेतकरी जे कर्ज देण्याबाहेर आहेत, त्यांना कर्जमुक्त करायचे आहेत. 30, 500 कोटी रूपये हे लागतात. हे पैसे पूर्ण वापरले तर नवीन काही करता येणार नाही. आम्ही केंद्राकड़े नवीन योजना घेऊन गेलो होतो.

– विधानसभा आमदार निलंबन – अर्थसंकल्पाच्या वेळी त्यावेळी 70 आमदार वेल मध्ये होते. मात्र ज्यांचे वर्तन चुकीचे होते त्या 19 आमदारांना निलंबित केले.

31 लाख शेतकरी यांच्यासाठी जी योजना करू तेव्हा उर्वरित शेतकरी जे कर्ज फेडत आहेत यांच्याकरताही काही योजना करू.

# धनंजय मुंडे – कर्जमाफी वरुन आमदार यांनी टाळ वाजवला तर त्यांचे वर्तन कसे चुकीचे.

#  हे सभागृह हे काही टाळ वाजवण्याकरता आहे का, असे समर्थन करणे चुकीचे आहे, ही सभागृहची परंपरा नाही. – मुख्यमंत्री

 

#  धनंजय मुंडे बोलत आहेत,  अनिल गोटे यांनी परिषद बरखास्त करा यांवर बोलत आहेत. यावर सभापती निर्णय घेत नाहीत तो पर्यन्त कामकाज होऊ देणार नाही.

#सभापती – हा विषय आत्ताच निदर्शनास आणून दिला, हे गंभीर आहे, मी 2- 3 दिवसांत निर्णय घेतो

# सुनील तटकरे – हे सभागृह थांबवा, हे गंभीर आहे.

अनिल गोटे यांच्या वक्तव्याचे विधानपरिषदमध्ये तीव्र पडसाद

#राणे – गोटे यांनी बोलावे आम्ही ते ऐकावे. हे घटनेमुळेच हे सभागृह स्थापन झाले आहे. त्या सदस्याल असे व्यक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिला.

#विनोद तावड़े – ज्या शेतक-यांसाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा सुरु आहे. नेते एसी बस मधून प्रवास करत आहेत. हे नक्की काय आहे ??

या मुद्द्यावरुन विरोधक कर्जमाफी मुद्द्यावरुन घोषणाबाजी करत आहेत

विधानपरिषद कामकाज दीड तासाकरता तहकुब

COMMENTS