मुंबई (11 ऑगस्ट ) – मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर आज विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी बोलताना काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी विविध अहवालाचे दाखले देत बुलेट ट्रेन कशी अव्यवहार्य आहे हे सांगितलं.
बुलेट ट्रेनने दिवसाला 100 फे-या केल्या आणि दररोज 1 लाख प्रवाशांची वाहतूक केली तरच ते फायद्याचं होईल असा IMM च्या अहवाल असल्याचं संजय दत्त यांनी सांगितलं. बुलेट ट्रेनचं भाडं ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या तिकीटापेक्षा जास्त असेल तर या बुलेट ट्रेनमधून कोण प्रवास करणार , असा सवाल संजय दत्त यांनी केला.
या ट्रेनची 12 स्थानके आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात फक्त 4 त गुजरातमध्ये 8, महाराष्ट्रात फक्त 33 टक्के कार्यक्षेत्र आणि गुजरातमध्ये 67 टक्के तरीही दोन्ही राज्यांना खर्च सारखाच करावा लागणार आहे. त्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. राज्य आर्थिक अडचणीत असताना आपल्याला तो खर्च परवडणारा आहे का ? असला पांढरा हत्ती का पोसायचा असा सवालही संजय दत्त यांनी केला.
COMMENTS