“2024 मध्ये भाजपचा “हा” नेता होणार पंतप्रधान !” कोणी केली भविष्यवाणी ?  वाचा सविस्तर

“2024 मध्ये भाजपचा “हा” नेता होणार पंतप्रधान !” कोणी केली भविष्यवाणी ?  वाचा सविस्तर

2014 साली विजयाचे श्रेय हे संपूर्णपणे नरेंद्र मोदींना दिलं जातं. अगली बार मोदी सरकार ही भाजपची कॅचलाईन होती. भाजपपेक्षा मोदींच्याच नावाचा अधिक वापर केला गेला आणि त्याचा फायदाही भाजपला झाला. त्यामुळे 2019 मध्येही भाजपचे तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार राहतील यात कोणतीही शंका नाही.

मात्र 2024 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील तर योगी आदित्यनाथ पंतप्रधान असतील असं भाकित आदित्य नाथ यांच्या वडिलांनी केलं आहे. सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ हेही मोदी यांच्या प्रमाणे प्रसिद्ध आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलच्या भाकिताने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. यावर भाजपमधून अजूनही काही प्रतिक्रिया आलेली नाही.

COMMENTS