विमान कंपनीचा हालगर्जीपणा, राजु शेट्टींना मनस्ताप !

विमान कंपनीचा हालगर्जीपणा, राजु शेट्टींना मनस्ताप !

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचा विमान कंपनीसह झालेला वाद तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पर्सनल सिक्युरिटीसह प्रवास नाकारणे या घटना ताज्या असताना आता विमान कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना बसला आहे. जेट एअरवेज या विमानाने आज मुंबई ते दिल्ली असा प्रवास राजू शेट्टी यांना करायचा होता. त्यासाठी शेट्टी यांच्याकडे बोर्डिंग पास होता. मात्र, त्यांना विमानातून प्रवास करताच आला नाही.

राजू शेट्टी यांनी बोर्डिंग पास घेतलेले असतांना त्यांना घेऊन जाण्यास जेट एयरवेज विसरले. मुंबई विमानतळ येथे आज सकाळी सहाच्या विमानाचे दिल्ली येथे जाण्यासाठी बिझनेस क्लासचे टिकिट घेतले व तास भर आधी विमानतळ वर पोहोचले, रितसर बोर्डिंग पास घेतले व वेळ होता म्हणून लॉन्ज मधे बसले त्यावेळी रजिस्टर मध्ये नोंद देखील त्यांनी केली. राजू शेट्टी कधीही प्रोटोकॉल घेत नाही तसेच मदतनिस देखील घेत नाही. काही वेळाने ते बोर्डिंग करता लॉन्ज बाहेर आले असता बोर्डिंग द्वार बंद झाल्याचे त्यांना कळविन्यात आले. बोर्डिंग पास घेतलेले असता असे विसरून जाने हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले असता जेट एयरवेजने सरळ हात वर केले. मात्र दिल्ली मीटिंग करता जाने जरूरी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यास शेट्टी यांनी  विनंती केली. त्यांना सात वाजताच्या विमानाचे बदली तिकीट दिले. मात्र या करता त्यांचा कडून 2000 रुपये जास्तीचे वसुल करण्यात आले. चूक नसल्याने या बाबत पैसे भरन्यास  शेट्टी यांनी नकार दिला असता जेट एयरवेज ऐकून घेण्याच्या मनस्थिति मधे नव्हते शेवटी शेट्टींनी कार्ड द्वारे 2000 रुपये पेमेंट दिले. मात्र त्याची पावती मागितली असता एयरवेज कंपनीद्वारे पावती सुद्धा दिली नसल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जेट एअरवेजच्या बेजबाबदार पणाचा फटका खासदार राजू शेट्टी यांना बसला. वरून त्यांना 2000 रूपये दंड आकारुन पुढील विमानाचे तिकीट दिले. याबद्दल एविएशन मिनिस्टरकडे तक्रार करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

COMMENTS