पाटणा – भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकजूट दाखवण्यासाठी पाटण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भाजप भगाओ, देश बचाओ’ रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणज्ये गेल्या काही दिवसांपासून एनडीएत सामिल होण्याची चर्चा असलेली राष्ट्रवादी काँग्रेसनेही या विरोधी पक्षांच्या रॅलीला हजेरी लावली. गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीलाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली होती. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामिल होणार अशा बातम्या येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार याकडे सगळयंचं लक्ष लागलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने लोकसभेतील पक्षाचे गटनेते तारीक अन्वर यांनी या सभेला हजेरी लावली.
या सभेसाठी बहुतेक सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. पाटण्यातील गांधी मैदान खचाखच भरले होते. यावेळी सर्वच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकरला लक्ष केलं. देशात आणिबाणीसाऱखी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या विरोधात कोणी बोलले की त्याच्याविरोधात कोर्ट केसेस दाखल केल्या जात आहेत असा आरोप आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केला.
COMMENTS