जळगाव – आपल्या वकीली चातुर्याने देशद्रोह्यांना, गुंडांना फासावर लटकवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना काल मात्र चोरांनी ठेंगा दिला. परवा ते दादर अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसच्या एसी बोगीतून प्रवास करत होते. मुंबईतून जळगावला जात होते. त्यावेळी त्यांचे दोन महागडे मोबाईल हँडसेट चोरीला गेले. त्याची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. २ जूनच्या मध्यरात्री निकम हे ए-१ या कोचमधून ३७ क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत होते. दादर ते पाचोरा दरम्यान त्यांचे मोबाईल चोरीला गेले. पाचोरा स्टेशनवरु ट्रेन सुटल्यानंतर मोबाईल चोरीला गेल्याचे निकम यांच्या लक्षात आलं. भुसावळ लोहमार्ग पोलिसांत निकम यांनी याबाबत फिर्याद दिलीय. उज्वल निकम यांच्यासारख्या व्हीआयपी व्यक्तीलाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने रेल्वेतील वाढती चोरी, गुन्हेगारी चव्हाट्यावर आलीय..
COMMENTS