गोव्यातील काँग्रेसचे माजी मंत्री व माजी आमदार विश्वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विश्वजीत हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र असून पर्रीकर सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात गैरहजर राहिल्याने ते चर्चेत आले होते. विशेष म्हणजे विश्वजीत यांनी त्यानंतर लगेचच आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचं सदस्यत्वही सोडलं होतं.
वालपोई मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या विश्वजीत राणे यांनी 16 मार्च रोजी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 17 जागा जिंकूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नव्हते. त्यामुळे नाराज राणे यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
COMMENTS