शरद पवारांचा भव्य नागरी सत्कार, गडकरींकडून तोंडभरुन कौतुक अन् कोपरखळ्याही !

शरद पवारांचा भव्य नागरी सत्कार, गडकरींकडून तोंडभरुन कौतुक अन् कोपरखळ्याही !

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज औरंगाबादमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय. या सत्कार सोहळ्या सर्वपक्षीय नेत्यांची हजरी होती. लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण, नितीन गडकरी,सुनील तटकरे, रावसाहेब दानवे, मंत्री, सर्वपक्षीय खासदार आणि आमदार उपस्थित होते.

सर्वच नेत्यांनी पवारांच्या गणगौरव सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. पवरांच्याकडून आजच्या पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे. अशा नेत्यांमुळे पदांची प्रतिष्ठा वाढते असंही गडकरी म्हणाले. पवारांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले. शरद पवार म्हणजे गोरगरीबांसाठी रात्र न दिवस काम करणारा खरा लोकनेता असल्याचंही गडकरी म्हणाले. यावेळी अधूनमधून गडकरींनी पवारांना कोपरखळ्याही मारल्या. पवार साहेब हे खूप हुशार राजकारणी आहेत.  ते केंव्हा काय करतील याचा नेम नाही. कार्यकर्त्यांना ते जेंव्हा कामाला लागा असा आदेश देतात तेंव्हा पुढच्याचं काम होतं किंवा तो कामातून जातो असंही गडकरी म्हणाले.

COMMENTS