मुंबई – आरक्षण आणि कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी, यांसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. भायखळापासून सुरू झालेला मराठा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला आहे. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून मराठा समाजाच्या मागण्या वाचून दाखवण्यात आल्या. यावेळी मराठा आरक्षणांची मागणी, कोपर्डी बलात्कारातील आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
या मराठा क्रांती मूक मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
“मोर्चेकऱ्यांच्या या सर्व प्रयत्नांना माझ्या मनापासून शुभेच्छा! त्याचप्रमाणे मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, ही सदिच्छा!” असं ट्वीट पवारांनी केलं आहे.
मोर्चेकऱ्यांच्या या सर्व प्रयत्नांना माझ्या मनापासून शुभेच्छा!
त्याचप्रमाणे मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, ही सदिच्छा!— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2017
.
COMMENTS