शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचा होणार गौरव !

शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचा होणार गौरव !

पुणे –केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माजी महिला महापौर आणि नगरसेविकांतर्फे कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या 1 जूनला बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पवार यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा ऍड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय पवार यांनी घेतला होता. या धोरणामुळे प्रशासकीय दृष्टीकोनातून अमुलाग्र बदल घडले पवार यांच्या प्रेरणेतून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षणाचा मार्ग खुला झाला. राजकीय पटावर महिलांचा सहभाग वाढला. पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा वृद्धिंगत करणाऱ्या पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त महिलांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, महापौर मुक्ता टिळक, उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS