सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ उलघडले

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ उलघडले

भारतीय स्वतंत्र लढ्यातील अग्रणी नेते सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ अखेर समोर आले आहे. 1945 रोजी झालेल्या तैवानमधील विमान अपघातात जखमी झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

सायक सेन या व्यक्तीने याबाबत एक आरटीआय अंतर्गत माहिती मागितली होती. यावर उत्तर देताना गृह मंत्रालयाने शहनवाज कमेटी, जस्टिस जीडी खोसला कमिशन आणि जस्टिस मुखर्जी कमिशन यांच्या अहवालानुसार नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला होता. मुखर्जी कमिशन यांच्या  अहवालामध्ये पान क्रमांक 112 ते 122 याबाबत माहिती आहे.

दरम्यान,  गृह मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणावर सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेताजीचे पंतू आणि पश्चिम बंगालचे भाजपा नेते चंद्र कुमार बोस यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गृह मंत्रालयाने याबाबत माफी मागावी असे म्हटले आहे.

 

COMMENTS