नाशिक : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी शासनावर चोहीकडून दबाव वाढला असून, राज्यातील शेतकरीही स्वयंस्फूर्तीने त्यात सहभागी होत आहेत. संघर्ष यात्रेचा शेवटचा टप्पा पनवेलमध्ये असून, त्यात मी देखील संघर्षासाठी उतरणार असल्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी चर्चा करतांना पवार म्हणाले कि, या संघर्ष यात्रेद्वारे शासनावर दबाव आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण बघूया सरकार काय करतंय ते, असेही शरद पवार यांनी यावेळी नमूद केले. शिवसेना काही मुद्द्यांवर सोबत आली असली तरी ती केव्हापर्यंत सोबत ते सांगता येत नाही आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे . तोपर्यंत कुणाचं काय होतंय ते बघू. पण ते बरोबर आले तर त्यांचं स्वागतच असल्याचेही पवार यांनी म्हटले.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आम्हाला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. मात्र, त्यानंतर आम्ही कधीच यंत्रणेला दोष दिला नव्हता. परंतु, इव्हीएम मशीनबाबत काल जे सत्य बाहेर आले ते गंभीर स्वरूपाचे आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी काल इलेक्शन कमिशनकडे मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याची मागणी केली असली तरी निवडणूक आयोगाने त्यांचा मुद्दा मान्य केलेला नाही. मात्र, काल दाखवली गेलेली तथ्य जर खरी असतील. या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
COMMENTS