शशिकलांना धक्का; शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

शशिकलांना धक्का; शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली – तमिळनाडूतील सत्तारूढ अण्णाद्रमुकच्या तुरुंगात असणाऱ्या सरचिटणीस व्ही. के.शशिकला यांनी शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही घडामोड शशिकला यांच्यासाठी मोठाच हादरा मानली जात आहे.

बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने शशिकला यांना दोषी ठरवून चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत शिक्कामोर्तब केले. या शिक्षेचा पुनर्विचार करावा, अशी याचिका शशिकला यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. मात्र, निकालात कुठलीही त्रुटी आढळली नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली.

 

 

COMMENTS