ब्रेकिंग न्यूज – शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न, तरूणाला अटक

ब्रेकिंग न्यूज – शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न, तरूणाला अटक

सातारा – शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर एका तरूणाने बुक्का  फेकण्याचा  प्रयत्न केला. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते आले होते त्यावेळी हा प्रकार घडला.  पोलिसांनी त्या तरूणाला  अटक केली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करून मंत्री तावडे व इतर मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने जात असताना मारुती जानकर याने त्यांच्या दिशेने बुक्का फेकला. ‘विनोद तावडे मुर्दाबाद’ अशी घोषणा देत त्यांच्यावर बुक्का टाकण्याचा प्रयत्न या तरुणाने केला केला. यावेळी भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी संबंधिताला रोखण्यासाठी धाव घेतली.

पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर फरपटतच त्याला बाहेर नेले. यापूर्वी भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रके भिरकावत भंडारा उधळण्यात आला होता.

COMMENTS