नारायण राणेंच्या दौ-याची सुरूवात नागपुरातूनच का ?   ‘हे’ असू शकतं कारण ?

नारायण राणेंच्या दौ-याची सुरूवात नागपुरातूनच का ? ‘हे’ असू शकतं कारण ?

मुंबई – नारायण राणे यांनी काल काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता ते राज्याचा दौरा करणार आहेत. राज्यातील जनतेशी ते बोलून पुढचा राजकीय निर्णय घेणार आहेत. दस-यापर्य़ंत ते पुढची वाटचाल काय असेल हे ठरवणार आहेत ?  राज्याच्या दौ-याची सुरूवात ते नागपुरातून करणार आहेत.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच्यावर राणेंचा सर्वात जास्त राग आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेतेही अशोक चव्हाण यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय. विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार केल्याचं बोललं जातंय. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे नागपुरात गडकरींना भेटायला गेले होते. तेंव्हा विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी सातव यांच्याकडे अशोक चव्हाण यांच्या तक्रारीचा पाढा वाचला अशीही चर्चा आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत हे इथे मुद्दाम सांगायला हवे. त्यामुळे अशोक चव्हाणांचे विरोधक आणि काँग्रेसमधील असंतुष्ट यांना गळाला लावण्यासाठी किंवा अशोक चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी राणेंचा हा दौरा नागपुरातून असू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

 

COMMENTS