नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय पातळीवरून कोणतीही विचारणा झाली नसल्याने आज होणाऱ्या या विस्तार शपथविधी कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते अनुपस्थित आहेत.
नव्या नऊ मंत्र्यांकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मित्र पक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. या मंत्रिमंडळात फक्त भाजपच्याच नेत्यांना स्थान देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊनच नव्या मंत्रिमंडळ विस्ताराची आखणी केली आहे.
COMMENTS