मुंबई – भाजपनं 2019 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून लोकसभेत 360 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. त्यानंतर आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेननंही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काल शिवसेनेची बैठक झाली. त्यामध्ये शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप हाच आपला शत्रू नंबवर 1 असल्याचं शिवसेनेच्या पदाधिका-यांना सांगण्यात आलं. आपसातले मतभेद बाजुला ठेऊन कामाला लागा.
या तयारीचा भाग म्हणून ज्येष्ठ नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार विदर्भाची जबाबदारी दिवाकर रावते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मराठवाडा, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांची जबाबदारी रामदास कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर ठाणे आणि कोकणाची जबाबदारी सुभाष देसाई यांच्याकडे, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरची जबाबदारी गजानन किर्तीकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुक स्वबळावर लढवण्याचे संकेत देत एनडीएमधून बाहेर पडण्याचेही संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. भाजपची मित्रपक्ष संपवण्याची भूमिका ओळखून इतर मित्र पक्षांनीही एनडएमधून बाहेर पडावं असं आवाहनंही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपेक्षा दुप्पट जागा जिंकण्याचं टार्गेट शिवसेनेनं ठेवलं आहे.
COMMENTS