काँग्रेसला धक्का, निवडणुक वॉररुमधील समन्वयक आशिष कुलकर्णी यांचा राजीनामा ! कोण आहेत कुलकर्णी ? काँग्रेससाठी किती महत्वाचे होते ?  का दिला राजीनामा ?  वाचा सविस्तर

काँग्रेसला धक्का, निवडणुक वॉररुमधील समन्वयक आशिष कुलकर्णी यांचा राजीनामा ! कोण आहेत कुलकर्णी ? काँग्रेससाठी किती महत्वाचे होते ?  का दिला राजीनामा ?  वाचा सविस्तर

दिल्ली – काँग्रेसची निवडणुक व्युहरचना ठरवण्यात महत्वाची भूमिका बजवणारे आणि त्याच्यातला ब्रेन समजले जाणारे आशिष कुलकर्णी यांनी वॉररुमधील समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. 2014 च्या पराभवानंतर सातत्याने पराभव स्विकारावा लागत असलेल्या आणि खचलेला काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जातोय.  प्रत्येक निवडणुकीत पडद्यामागे राहून व्यहरना आखण्यात कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता.

कोण आहेत आशिष कुलकर्णी ?

आशिष कुलकर्णी यांनी निवडणूक समन्वयाचं काम करण्याची सुरूवात शिवसेनेमध्ये केली होती.

शिवसेनेच्या अत्यंत जवळचे समजले जायचे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याही ते अत्यंत निकटचे समजले जायचे. मनोहर जोशी यांना राजीनामा देण्यासाठी सांगणारी बाळासाहेबांची चिठ्ठी मातोश्रीवरुन मनहोर जोशी यांना देणारी व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे. यावरुन ते शिवसेनेचे किती जवळ होते याचा अंदाज येईल.

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी जेंव्हा शिवसेना सोडली तेंव्हा कुलकर्णीही त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. त्यापूर्वी काही काळ त्यांनी मनसेतही काम केलं. पण ते कधीही राणे समर्थक म्हणून ओळखले गेले नाहीत. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव, तत्कालीन महारष्ट्र प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्याजवळ गेले. आणि तिथून थेट काँग्रेस हायकमांडच्या जवळ गेले. विविध राज्यात काँग्रेसच्या निवडणुक प्रचाराची रणनिती आखण्याचं काम कुलकर्णी यांनी केलं. राज्यातही त्यांनी विखे पाटील,  दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यासोबत काम केलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीचे विविध सर्व्हे यांचा अभ्यास करण्याचं आणि त्यावरू निष्कर्ष काढण्याचं काम त्यांनी केलं. ज्येष्ठ नेते मधसुधन मिस्त्री, रणदिप सुरजेवाला यांच्यासोबत तीन जणांच्या समितीमध्येही त्यांचा समावेश होता. 2014 साली काँग्रेसचे उमेदवार ठरवण्यासाठी सल्लागार समिती होती. त्यामध्ये या समितीचा समावेश होता.

का दिला राजीनामा ?

पक्षात मोठ्या प्रमाणात ढिसाळपणा आला असून तो कमी करण्याची कोणीही प्रयत्न करत नाही असा त्यांचा आरोप आहे.

काँग्रेस पक्ष अती डावा झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

काँग्रस पक्षाची प्रतिमा हिंदु विरोधी झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

जेएनयू प्रकरणात पक्षाने घेतलेली भूमिका कुलकर्णी यांना पसंत पडली नाही.

जम्मू काश्मिरमधील फुटरवाद्यांविषयी काँग्रेसला जास्त आपुलकी असल्याचाही कुलकर्णी यांचा आरोप आहे.

 

वरील सर्व कारणांमुळे त्यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे.

COMMENTS