शिवसेनेचा आज 51 वा वर्धापन दिन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांच लक्ष

शिवसेनेचा आज 51 वा वर्धापन दिन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांच लक्ष

मुंबई – शिवसेना आपला 51 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे. या सोहळ्यात पुढील वाटचालीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपसोबत शिवसेनेने वाद हे सर्वांनाच माहिती आहे. सत्ते असूनही भाजप सेनेला दुय्यम वागणूक देते असा आरोप शिवसेनेने नेहमीच केला आहे. तर अनेक प्रश्नांवर सेना विरोधी पक्षाप्रमाणे भाजपला कोंडीतही पकडते. अशाच तापलेल्या वातावरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आगीत तेल ओतून गेल्याचे बोलले जात आहे. राज्यात मध्यावधी झाल्या तर भाजप जिंकेल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे आता शिवसेनेनेला हे भाजपकडून हे थेट आव्हानच मानले जात आहे. अशात आज उद्धव ठाकरे हे काही महत्वाची भूमिका मांडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या निवडणुकीच्या निमित्तानेच अमित शहा यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली. या निवडणुकीत NDA सोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवलाय. मात्र आधी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर मग पाठिंब्याचं पाहू अशी ताठर भूमिका शिवसेनेनं घेतलीय. सरसंघचालक मोहनराव भागवत आणि कृषीतज्ञ स्वामिनाथन हे दोन पर्याय शिवसेनेनं भाजपला सुचवले आहेत. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांचे भाषण संपूर्णपणे राजकीय मुद्द्यांवर केंद्रित असणार असा अंदाज व्यक्त केला जातोय.

 

COMMENTS