शिवसेनेचा आणखी एक मास्टरस्ट्रोक !

शिवसेनेचा आणखी एक मास्टरस्ट्रोक !

मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं मुंबई महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडून दिली  आहे. या सर्व घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेनं आणखी एक मास्टरस्ट्रोक मारला आहे.  

मनसेच्या 6 नगरसेवकांकडे संमती पत्र असल्याचा दावा शिवसेनेनं कोकण आयुक्तांसमोर केला आहे. तसेच या 6 नगरसेवकांचा नवा गटही स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता हा गट शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं समजतं आहे. त्यामुळे मनसेने कोणतीही हालचाल करण्यापूर्वीच शिवसेनेनं गटस्थापन करुन आपली दुसरी खेळीही खेळली आहे.

विरोधकांना कोणतीही संधी न देता शिवसेनेनं एकापाठोपाठ एक अशा चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेत गोंधळ उडाला आहे तर भाजपलाही जोरदार चपराक बसली आहे .

 

COMMENTS