शिवसेनेची पोस्टरबाजी; कर्जमाफीच्या निर्णयानंतर श्रेयवादासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई

शिवसेनेची पोस्टरबाजी; कर्जमाफीच्या निर्णयानंतर श्रेयवादासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई

मुंबई –  सरकारला धारेवर धरुन एखादा निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर ज्या थाटात विरोधकांकडून आपल्या यशाची दवंडी पिटली जाते त्याच थाटात शिवसेनेने ही कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेयाबद्दल फलक लावले आहेत. शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या या फलकावर कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय पूर्णपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना- भाजपा पुन्हा एकदा आमने सामने येणार अशी चिन्हे दिसत आहेत.

मुंबईसह भाजपचे मुख्यालय असलेल्या परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाले. अखेर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी कर्जमाफी आणि आंदोलनासंदर्भात सुरूवातीपासूनच सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने सोमवारी मुंबईत लावलेल्या फलकांवरून या वादाची ठिणगी पडू शकते.

 

 

 

COMMENTS