कर्जमाफीची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेने सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील ठिकठीकांनी बॅंकांसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारने 34 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. प्रत्यक्षात मात्र शेतक-यांच्या हातात पैसैच आलेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या कर्जवसुलीसाठी बँकेचे अधीकारी जसे दारात येतात. त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी बँकेच्या दारात जाऊन शिवसेनेकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा बँकेसमोर खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. पुणे जिल्हा बँकेसमोर झालेल्या आंदोलनात महिला शिवसैनिकांची संख्या ही लक्षणीय होती. नागपूरातही शिवसैनिकांनी आंदोलन केले. नाशिकमध्ये मनमाड य़ेथे बँकांच्या शाखेबाहेर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
COMMENTS