गोव्यात भाजपची पलटी, म्हणे राज्यात गोमांसबंदी नाही !

गोव्यात भाजपची पलटी, म्हणे राज्यात गोमांसबंदी नाही !

पणजी – देशभरात गोमांसबंदी घालणा-या भाजपने गोव्यात मात्र कोलंटउडी मारली आहे. देशभरात गोमांसबंदी असली तरी गोव्यात गोमांस बंदी नाही असं वक्तव्य भाजपचे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केलं आहे. गोव्यात पर्यटक येऊन त्यांना हवं ते खाऊ शकतात. गोव्यात बीफ बंदी नसल्यामुळे त्यांना कोणतीही अडचण नाही असंही आजगावकर यांनी म्हटलं आहे. कोलकत्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. गोव्यात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चिन हे गुण्यागोविंदाने राहतात असंही त्यांनी पुढे सांगितलं. देशभर गोमांसबंदीसाठी आग्रह धरणारे भाजप नेते यावर काय भूमिका घेतात ते पहावं लागेल. तसंच गोमंसाच्या प्रकरणावरुन मारझोड करणारे तथाकथीत गोरक्षक आता आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या या वक्तव्यावर काय भूमिका घेतात ते पहावं लागेल.

COMMENTS