मुंबई – शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची आज झालेली बैठक वादळी झाली आहे. वारंवारच्या धरसोड भूमिमुळं आमदारांनी पुन्हा एकदा मंत्र्यांना धारेवर धरलं. त्यामुळे मंत्री निरुत्तर झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. ग्रामिण भागातील शिवसेनेचे आमदार अधिक आक्रमक होते. कर्जमाफीच्या मुद्दयावरुन त्यांनी आपल्याच मंत्र्यांवर हल्लाबोल केला. कर्जमाफी झाल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, बजेट मांडू देणार नाही अशी भूमिका सुरूवातीला शिवसेनेने घेतली होती. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिल्लीवारी केली आणि पक्षाचा सरकारचा विरोध मावळला. त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले असताना शिवसेना मात्र मुळमुळीत भूमिका घेत आहे. आता मतदारसंघात आम्ही मतदारांना काय सांगणार असा सवाल आमदारांनी केला. मतदारांनी आता आमचे कपडे काढायचेच बाकी ठेवले आहेत. अशा भाषेत आमदारांनी आपला संताप व्यक्त केला.
COMMENTS