शिवसेनेच्या बैठकीत नेमकी काय झाली चर्चा ?

शिवसेनेच्या बैठकीत नेमकी काय झाली चर्चा ?

मुंबई –  आज  उद्धव  ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीत पक्ष मजबूत करण्यासाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचे आदेश देण्यात आले. तर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी देण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी मुळे या बैठकीत महत्त्वाची घोषणा होण्याची होती. पण, आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि पक्ष संघटन मजबूत करणे, याविषयावर चर्चा झाली. त्यात पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे विभागीय मेळावे घेण्याचा निर्णय झाला.

आजची बैठक संघटनात्मक बैठक होती. शिवसेना भवनात जशी जिल्हा प्रमुखांची बैठक झाली तशी आज संपर्क मंत्री आणि संपर्क प्रमुखांची बैठक होती.  असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार, एनडीए आणि भाजप युती या संदर्भात चर्चा झाली नाही, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS