शिवसेनेत उद्धव ठाकरेचें आदेश मानले जातात का ? मंत्री, खासदारासमोर वाहतूक सेना अध्यक्ष भडकला !

शिवसेनेत उद्धव ठाकरेचें आदेश मानले जातात का ? मंत्री, खासदारासमोर वाहतूक सेना अध्यक्ष भडकला !

मुंबई – शिव वाहतूक सेनेचा काळ मेळावा झाला. या मेळाव्यात शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी आराफात यांनी त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यावर भर कार्यक्रमात थेट आरोप केल्याने एकच खळबळ उडाली.  या कार्यक्रमाला राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि खासदार अनिर देसाई उपस्थित होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर त्यांनी थेट आणि गंभीर आरोप केले.  परिवहन मंत्र्यांनी गेल्या तीन वर्षात रिक्षाचालकांसाठी एक स्टँड तरी बांधला का ?  असा सवाल करत रावते हे मला जातीवाचक शिवीगाळ करतात असाही आरोप केला.

सामनातील उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व वाहतूक संघटनेचे नेतृत्वामाझ्याकडे देण्यात आले आहे. तरीपण माझ्याच कार्यकर्त्यांना पक्षातले लोक मारहाण करतात. रावते हे भेट नाकारतात असाही आरोप अराफात यांनी केला. मी शिवसेनेतच राहणार मात्र माझं ऐकलं जाणार नसेल तर मला वाहतूक सेनेचं अध्यक्षपद नको असंही अराफत म्हणाले.

त्यानंतर अनिल देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी त्यांची समजूत काढली आणि सबुरीचा सल्ला दिला. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचेच आदेश मानले जातात असंही देसाई यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन यावर तोडगा काढू असं आश्वासन खोतकर यांनी अराफात यांना दिलं.

COMMENTS