शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करत आहात ? सुप्रीम कोर्टने सरकारला फटकारले

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करत आहात ? सुप्रीम कोर्टने सरकारला फटकारले

शेतक-यांच्या आत्महत्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. शेतक-यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. आत्महत्या झाल्यानंतर शेतक-यांची मदत करून उपयोग नाही तर आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय पावले उचलत आहे, असा कडक शब्दांत सुप्रीम कोर्टाने समाचार घेतला. येत्या सहा महिन्यात सरकारने शेतक-यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी काय काम करणार , याची माहिती सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. सिटीजन क्रांती या संस्थेने याचिका दाखल केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने शेतक-यांसाठी २० योजना सुरू केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम वर्षभरात दिसेल, अशी माहिती कोर्टाला दिली. तसेच, एका रात्रीत शेतक-यांच्या आत्महत्या रोखता येणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले. सविस्तर सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला ६ महिन्यांचा कालावधी दिला आहे. सहा महिन्यानंतर सुनावणी होईल.

COMMENTS