शेतकरी कर्जमाफीसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता 15 सप्टेंबरची डेडलाईन !

शेतकरी कर्जमाफीसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता 15 सप्टेंबरची डेडलाईन !

शेतकरी कर्जमाफीसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरकारने आता 15 सप्टेंबर ही डेडलाईन ठेवली आहे. सुरूवातीला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरणयाची मुदत होती. ती वाढवून आता 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीने आज (ता.२२) ही घोषणा केली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यासाठी २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे.

राज्यात काही ठिकाणी ई सेवा केंद्रांमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक केंद्रे बंद अवस्थेत आहेत. विशेषतः इंटरनेटचा वेग आणि इतर बाबी अडचणीच्या ठरत आहेत. त्यावर मात करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला समितीने निर्देश दिले आहेत. दोष दुरुस्त करुन लवकरात लवकर राज्यातील सर्व ई सेवा केंद्रे सुरु होतील अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  तरीही त्यात कितपत सुधारणा होईल याबाब साशंकताच आहे.

२१ ऑगस्टअखेर २१ लाख ५७ हजार ३४४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १७ लाख ९५ हजार १०४ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन झाले आहेत. राज्यात सध्या एकेका दिवसात एक ते सव्वा लाख शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन होत आहेत. उर्वरीत सुमारे ७१ लाख शेतकऱ्यांना येत्या १५ सप्टेंबर पूर्वी अर्ज भरावे लागणार आहेत.

COMMENTS