कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची विरोधी पक्षांनी हमी देण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी केलेल्या विधानालाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुळात शेतकरी आत्महत्यांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढली असताना सत्ताधारी पक्षाने अशी विधाने करणे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. स्वतः खा. दानवे पाटील यांच्या जालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत असून, हिंमत असेल तर त्यांनी आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हमी मागून दाखवावी.
या पश्चातही शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष लेखी हमी द्यायला तयार आहे. एक हमी विरोधी पक्ष देईल. एक हमी सरकारनेही द्यावी. राज्यात पुन्हा नैसर्गिक संकट येणार नाही आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतमालाची उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल इतक्या हमीभावाने खरेदी करण्याचे सरकारने लेखी मान्य करावे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
COMMENTS