काल (शुक्रवारी) मध्य रात्री मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र तरीही नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम आहे.
पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद आहेत. मुख्यमंत्र्यांनी 100 टक्के मागण्या मान्य न केल्यानं आज पुणतांब्यात शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात निदर्शनं केली. आम्ही संपावर ठाम असल्याचं काही गावकऱ्यांनी सांगितल आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यापेक्षा अधिक मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यापेक्षा कमीच मागण्या मान्य झाल्या, असं म्हणत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याच गावातील कोअर कमिटी सदस्यांचा निषेध केला.
नाशिकमध्ये ही शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतलेला नाही. येवला तालुक्यातील सायगावला संप सुरूच आहे. सरकारने दिलेले आश्वासन शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सायगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या निर्णयाचा निषेध करत आहे. दुग्ध संस्था पूर्णतः बंद ठेवत शेकडो लिटर दुध रस्त्यावर ओतून दिले.
शिर्डी – राहाता तालुक्यातील वाकडी गावातील शेतकर्यांनी संप मागे घेतलेला नाहीये . गावात जागरण गोंधळ आंदोलन करत शेतक-याच्या संप सुरुच आबे .पुणतांब्याच्या कोर कमेटीच्या वाटाघाटी शेतकर्यांना मान्य नाही . पुणतांब्यातील काही शेतकर्यांचाही कमेटीच्या निर्णय मान्य नाही . पुनतांब्यात कोर कमेटीच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
शेतक-यांनी रोखला पुणे- सोलापूर महामार्ग
पुणे – इंदापुर तालुक्यातील शेतकरी संपावर ठाम.. पुणे सोलापूर महामार्ग रोखला… शेतक-यांचा संपुर्ण सातबारा कोरा करा.. स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करा.. या मागण्यांसाठी कळस, पिलेवाडी ,डाळज नं 1,2,3 भादलवाडी भिगवण येथील शेतक-यांनी पुणे -सोलापूर महामार्ग डाळज -चौफुला येथे ‘रास्ता रोको’ केला.
COMMENTS