“शेतकरी कायम परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकऱ्यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केलं पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं. हा पवित्रा शेतकऱ्यांसाठी घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांचे धन्यवाद.” असं उद्धव ठाकरें म्हणाले, ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरें म्हणाले की, “आत्महत्याग्रस्त जिह्यासाठी मदत द्या, अशी बातमी वाचली. एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे.” शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे, पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच सरकारने दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही, असा कारभार केला पाहिजे आणि मला तशी अपेक्षा आहे.”
दरम्यान, पेट्रोलवर व्हॅट लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल दर खाली आले आहेत. तरीदेखील आपल्या देशात दर चढेच आहेत. जर समान कर लावणार असू तर देशभरातील दर समान असायला हवेत, अशी माझी अपेक्षा आहे. इतर राज्यात आपल्या सोयीने दर लावतात. त्यामुळे दरवाढ होते. जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवेत. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकले जात असेल तर ते चूक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
COMMENTS