शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी तृतीयपंथीयांचे अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी तृतीयपंथीयांचे अन्नत्याग आंदोलन

पुणे – राज्यातील शेतक-यांची कर्जमाफ़ी आणि शेतमालास हमी भाव मिळावा  या मागणीसाठी आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तृतीय पंथीयांकडून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

यावेळी तृतीयपंथी गब्रेल म्हणाल्या की, शेतकरी राजा काळया मातीमध्ये एक प्रकारे सोने पिकवतो. त्याच्याकड़े या सरकारचे लक्ष नाही.त्यांच्याकड़े विशेष लक्ष देण्याची गरज असून त्याच्या मालास हमी भाव आणि कर्जमाफी मिळाली पाहिजे.त्याच बरोबर त्यांच्या मुलांचे शिक्षणाचा खर्च सरकार ने उचला पाहिजे. आत्महत्या करणा-या शेतक-यांचे प्रमाण वाढत असून यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने एक दिवसीय अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाला भेट दिली.  यावेळी शेट्टी म्हणाले की, दळभद्री सरकारच्या डोळयात अंजन घालण्याचे काम तृतीय पंथीयांनी अन्नत्याग आंदोलानामधून दाखवून दिले आहे. येत्या काळात तीव्र लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

COMMENTS