पुणे – द्राक्ष बागायतदार महासंघाच्या वार्षिक अधिवेशनासाठी आज नितीन गडकरी पुण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतक-यांनी आता पारंपरिक पिके घेऊ नये. कापूस, गहू, ज्वारी अशी पिके घेतल्यास शेतक-यांची प्रगती होणार नाही. त्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला पाहिजे असंही गडकरी म्हणाले. पारंपरिक पिकांपेक्षा शेतक-यांनी आता बायोफ्युअल कडे वळावे असा सल्ला त्यांनी दिला. तरच शेतक-यांना अच्छे दिन येतील असंही गडकरी म्हणाले.
शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने जालन्यामद्ये ड्राय पोर्ट उभं करण्याचे काम सुरू असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. देशातील सर्व विमानतळांवर आता एक्सपोर्ट क्वालिटिची फळे विक्रीला ठेवणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
COMMENTS