सतेज पाटलांचे सदाभाऊ आणि महादेव जानकरांना चॅलेंज !

सतेज पाटलांचे सदाभाऊ आणि महादेव जानकरांना चॅलेंज !

मुंबई – शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकर-यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. त्यावरुन आता सरकावर जोरदार टीका होऊ लागली आहे. या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले. सहकारी मंत्री किंवा सदाभाऊ खोत किंवा महादेव जानकर यांनी शेतक-यांसाठीचे ऑनलाईन अर्ज कोणाच्याही मदतीशिवाय भरुन दाखवावे असं आव्हान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलं आहे. कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी अर्ज भरले तर त्यांचा आपण जाहीर सत्कार करु असंही त्यांनी सांगितलं.  शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज किचकट आहे. शिकलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येतात शेतकरी शेतीची कामे सोडून अर्ज कसे भरणार असा सवालही त्यांनी केला. ऑनलाईन अर्जाचा प्रकार तातडीने बंद करण्याची मागणीही त्यांनी केलीय.

COMMENTS