मुंबई – सरकारविरोधात महागाई आणि इंधन दरवाढीच्याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. मात्र सत्तेतून बाहेर पडण्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ग्रामीण भागातील आमदार सत्तेतून बाहेर पडण्याच्या विरोधात आहेत. आम्हाला विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नये अशी त्यांचे मत आहे. तो संदेश त्यांनी मातोश्रीपर्यंत पोचवला आहे. दोन वर्ष सत्तेमध्ये राहून ग्रामिण भागात पक्ष वाढवावा अशी त्यांची भूमिका आहे. तसंच आगामी मंत्रीमंडळ फेरविस्तारात शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना वगळून ग्रामिण भागातील मंत्र्यांची वर्णी लावावी अशीही त्यांची मागणी आहे. तर मुंबई आणि परिसरातील आमदार सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीतीमध्ये आहेत. शिवसेनेतील सूत्रांनीच ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
COMMENTS