सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर काय म्हणाले सदाभाऊ आणि राजू शेट्टी ?

सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतर काय म्हणाले सदाभाऊ आणि राजू शेट्टी ?

पुणे – सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत आज घोषणा केली.

”आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे”, असे दशरथ सावंत म्हणालेत.तसेच ”सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती यावेळी सांगण्यात आली.

यावर कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘ हकालपट्टी झाली याच दुःख झालं. माझ्यावर कारवाई करून जर पक्ष नेतृत्वाला, आनंद होत असेल तर, तर त्यांना आनंद घेऊ देत. मारहाण आणि लाठ्या काठ्या खाऊन मी अनेक वर्षे शेतकरी चळवळीत काम केलं.  मंत्री झाल्यानंतर शेतकार्यासाठीचे अनेक चांगले निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्याचं काम केले. राजू शेट्टी यांनी अनेक निवडणुकीत, वेगवेगळ्या पक्षा बरोबर आघाड्या केल्या आहेत. त्यांनी काय निर्णय घायचा हे तेच ठरवितात.’

‘सदाभाऊ खोत यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांची संघटनेमधून हाकालपट्टी करण्याचा राज्य कार्यकारणीचा निर्णय घेतलाय. सरकारमध्ये आत्ता आमचा कोणी प्रतिनिधी नाही. येत्या आठ दिवसात कार्यकरणीची बैठक घेउन पुढील दिशा ठरवणार आहे. सदाभाऊ यांची हाकालपट्टी केल्यामुळे संघटनेवर परिणाम होणार नाही.’ असे राजू शेट्टी म्हणाले.

 

 

COMMENTS