सदाभाऊ खोत यांनी जाहीर केला यंदाचा ऊस दर, एफआरपी अधिक 300 रुपये !

सदाभाऊ खोत यांनी जाहीर केला यंदाचा ऊस दर, एफआरपी अधिक 300 रुपये !

कोल्हापूर – यंदा उस दरसाठी शेतक-यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आणि आपणच रयत क्रांती संघटनेच्या दसरा मेळाव्यात उसाचा दर घोषित करु अशी घोषणा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यानुसार आज त्यांनी आज त्यांच्यासंघनेमार्फत ऊसदराची घोषणा केली. एफआरपी अधिक 300 रुपये असा दर यंदा ऊसाला मिळायला हवा अशी मागणी त्यांनी  केलीय. आता सरकार उसाचा हा दर देतं का ?  शेतक-यांना हा उसदर मान्य होतो का ते पहावं लागेल.

संघटनेच्या आजच्या पहिल्याच दसरा मेळाव्यात त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीका केली. शेतक-यांनी सांगितलं तरच आपण राजीनामा देऊ इतर कुणी सांगितली तरी राजीनामा देणार नाही असंही सदाभाऊ म्हणाले.

COMMENTS