समाजवादी पक्षाचे नेते आझम खान पुन्हा बरळले

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान पुन्हा बरळले

लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मंत्री तथा सपचे नेते आझम खान पुन्हा बरळले आहेत. लष्कराविषयी आझम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आझम म्हणाले की, काश्मीरमध्ये महिलांनी जवानांना मारहाण केली आहे. त्याचबरोबर काश्मीरच्या महिलांनी बलात्काराचा बदला घेण्यासाठी जवांनांची गुप्तांगे कापली आहेत. आसाम आणि झारखंडमध्येही जवानांना महिलांच्या हातचा मार खावा लागला आहे.

आझम खान म्हणाले, “काश्मीरमध्ये महिलांनी जवानांना चोपले. इतकेच नाही तर महिलांनी जवानांची गुप्तांगं कापली. बलात्काराच्या घटनांमुळे बदला घेण्यासाठी महिला दहशतवादी जवानांची गुप्तांगं कापत आहेत. अशा घटना या संपूर्ण भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे. जगात तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही.

दहशतवादी जवानांचे हात-पाय तोडत नाहीत, त्यांना त्यांच्या शिराचीही अडचण नाही. त्यांना जवानांच्या ज्या अवयवाची तक्रार होती तो ‘पार्ट’ त्यांनी कापला असेही आझम खान म्हणाले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते. त्यावेळी काही जवानांची गुप्तांगं कापल्याचे समोर आले होते. त्याचाच आधार घेत आझम खान यांनी हे वक्तव्य केले.

 

 

COMMENTS