नाशिक – ‘देशात आणि राज्यात आणि शेतकऱ्यांसाठी मोठी संकट निर्माण झाले आहे. देशात महागाईने उचांकी गाठली आहे. शेतीमालाच्या किमतीची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी उद्वस्थ झाला तर देश उद्वस्थ होईल. सरसकट कर्जमाफी देणार असे भाजपाने जाहीरनाम्यात अश्वाशन दिले होते. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही त्यामुळे सामुदायीक ताकत दाखवण्याची हीच वेळ आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं जेवण. सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. नाशिक येथे राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशनाच्या कार्यक्रमात आज बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, ‘शेतीमालाच्या किमती बरोबर खेळणं देशाला परवडणार नाही. आज बळीराजा गप्प आहे उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तो कुणाच्या बापाला घाबरणार नाही . नाशिक जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. संपूर्ण जगात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले भारतात मात्र वाढत आहे. तेल संदर्भात देशात लूट सुरू आहे. नोट बंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था उद्वस्थ झाली.’
COMMENTS