सरकारने “गाई” पेक्षा “बाई”कडे जास्त लक्ष्य द्यायला हवं होतं – चित्रा वाघ

सरकारने “गाई” पेक्षा “बाई”कडे जास्त लक्ष्य द्यायला हवं होतं – चित्रा वाघ

मुंबई – GST वर १२% कर आकारण्यात आला आहे. GSTतून सॅनिटरी पॅड वगळावेत ही आमची मागणी आम्ही वांरवांर राज्यसरकार कडे केली. सॅनिटरी पॅड करमुक्त व्हावेत यासाठीच स्वाक्षरी मोहीम मुंबईत राबवली व राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे सुपूर्द केली. मेकअप च्या वस्तू स्वस्त असतांना महिलांच्या आरोग्याशी निगडीत वस्तूंवर कर हा कुठला न्याय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलाय. कोणते बेटी बचाओ चे नारे ?? कुठे चाललयं स्त्रीचं आरोग्य ?? बेटी बचाओ, बेटी बढाओ चे नारे देणारे मोदी सरकार जेव्हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आला तेव्हा मात्र सरकार ने आपला हात आखडता घेत महिलां विषयी यांची काय भूमिका आहे हे दाखवून दिले. आज ही ८०% महिला सॅनिटरी पॅड परवडत नाही म्हणून वापरत नाही, २०% महिला आज ही अनभिज्ञ आहेत. जगा मध्ये दरवर्षी २७% महिला गर्भाषयाच्या कर्करोगाने मरण पावतात त्यात भारतीय महिलांचा टक्का मोठा आहे. सॅनिटरी पॅड हे आमच्या चैनीची नाही तर आरोग्यासाठी अतिशय गरजेची आहे. राष्ट्रवादी महिला कॉग्रेसने राज्यातील ६५ जिल्हा/शहरातून पंतप्रधान व अर्थमंत्री यांना पोस्टाने सॅनिटरी पॅड पाठवून निषेध व्यक्त केला.

COMMENTS