उस्मनाबाद – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे अमर पाटील हे तेरचे कारभारी बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतीची निडवणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होत आहे. यामध्ये तेर (ता. उस्मानाबाद) येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या वर्गाकडे गेले आहे. त्यामुळे माजी मंत्री तथा डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधु अमर पाटील यांनी आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वीही त्यांनी काही काळ गावावर सत्ता गाजविली होती. दरम्यान गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा परभाव झाला होता. यंदाच्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र त्यांना तेर मधुन संधी मिळाली नाही. त्यामुळे सरपंच पदासाठी त्यांनी पुन्हा एकदा दंड थोपाटले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाईकवाडी तसेच फंड फॅमिलीतील काही इच्छुक आहेत. त्यामुळे श्री. पाटील यांना पक्षातूनच विरोध होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गावचे कारभारी बनण्यासाठी डॉ. पाटील घराण्यातील व्यक्तींना संधी मिळणार की इतर उमेदवारांना संधी देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. खुल्या वर्गासाठी सरपंचपद सुटल्याने तेरच्या निवडणुकीत चांगलीच रंगत भरणार असल्याचे संकेत सुरूवातीलाच मिळू लागले आहेत.
Older Post
‘राज’गर्जना आता फेसबुकवर…
COMMENTS