सोलापूर:- ऊसाला दर मिळावा यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण मिळालं. सोलापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर जोरदार राडा झाला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर रक्ताच्या बाटल्या फोडून घेतल्या. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोरही आंदोलन करण्यात आलं. आजपासून बळीराजा शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. ऊसाला योग्य दर जाहीर करेपर्यंत बळीराजा संघटना कारखान्यासमोर तळ ठोकणार आहे. आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे.
लोकमंगल साखर कारखाना शेतकरी संघटनेच्या रडारवर आहे. त्यामुळेच इथे सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
COMMENTS