लखनौ – उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये जातीय संघर्षानंतर राजकारण तापले आहे. येथील हिंसेनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 27 मे ला सहारनपूरला जाणार होते. परंतु यूपीचे एडीजी आदित्य मिश्रा यांनी राहुल गांधींना सहारनपूरला दौऱ्याची परवानगी नाकारली आहे.
अनेक पक्षाचे राजकीय नेते येथे ठाण मांडून आहेत. विरोधक यावरुन राजकारण करत आहेत. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या सहारनपूर येथे गेल्या होत्या. त्यानंतर तेथे हिंसा भडकली होती. सध्या सहारनपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहेच. परंतु आणखी परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलीस आणि सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
COMMENTS