भिवंडीत काँग्रेसची एक हाती सत्ता

भिवंडीत काँग्रेसची एक हाती सत्ता

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकांचे अंतिम निकाल समोर आले असून भिवंडीकरांनी काँग्रेसला जवळ केल्याचे दिसून आले.

भाजपसह शिवसेनेने भिवंडीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या दोघांच्या तुलनेत अत्यंत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या काँग्रेसने भाजपबरोबर सेनेलाही धोबी पछाड दिल्याचे दिसून आले.  90 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला 19 जागांवर विजय मिळवला आहे. तर त्या पाठोपाठ 12 जागांवर शिवसेना विजय मिळवण्यात यशस्वी राहिली आहे. काँग्रेसला  गड राखण्यात यश मिळालं आहे. काँग्रेसला 47 जागांवर विजय मिळवला आहे. सपाचे दोन उमेदवार विजयी झाले तर 10 अपक्ष उमेदवारांना विजय मिळवला आहे.

COMMENTS