सांगली, पुण्यात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे !

सांगली, पुण्यात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे !

सांगली,  पुणे :- दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आज शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.  बैलगाडी, ट्रकटर, वारकरी यांच्यासह शेकडो शिवसैनिक या शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

तसेच, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,दसर्यापर्यंत शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय दणानून सोडले.शिवसेना पुणे जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आज हे अंदोलन करण्यात आले. पुणे जिल्ह्याचे सर्व नेते महिला आघाडीचे नेत्या, युवासेनेचे कार्यकर्ते व हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

COMMENTS