दस-यापूर्वी कर्जमाफी द्या, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

दस-यापूर्वी कर्जमाफी द्या, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई – शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतक-यांना दिवाळीपर्यंत नाही तर दस-याच्या आधी कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. रब्बी पेरणीसाठी शेतक-यांना पैसे हवे आहेत. त्यामुळे कर्जमाफी दस-यापर्यंत झाली तर त्याचा शेतक-यांना रब्बी पेरणीसाठी फायदा होईल असा युक्तीवाद शिवसेनेमार्फत करण्यात आलाय.

 

दिवाकर रावते, रादमदास कदम, सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवसेनेच्या मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. कर्जमाफीची घोषणा झाली. मात्र अजून एकाही शेतक-याला कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. तरी शेतक-यांना दस-यापर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवेसेनेनं केलीय. यावर मुख्यमंत्र्यांनी आपण दस-यापर्यंत पात्र शेतक-यांची यादी तयार करुन लवकरात लवकर कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.

 

COMMENTS