मुंबई – ‘जे मुंबईत रस्ते, नाल्यांच्या कामांचा दर्जा सांभाळू शकत नाही. नव्या कल्पनांचे “खड्डे” ज्यांच्याकडे.. त्यांनी उगाच बुलेट ट्रेनची काळजी करु नये’ अशी जोरदार टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.
‘जपानच्या पंतप्रधानांच्या रोड शोनंतर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा शिलान्यास होतो, पण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अनेक आणि प्रचंड रोड शोनंतर त्या समाजाच्या मागण्यांसाठी एका उपसमितीचे घोंगडे फेकले जाते. या घोंगडय़ाखाली काय दडलंय ते याक्षणी कुणीच सांगू शकणार नाही.’ अशी टीका शिवसेनेने सामन्यातून केली होती. त्याला आशिष शेलार यांनी ट्वीटवरून सडेतोड उत्तर दिले.
‘ज्यांनी मराठा मुक मोर्चाचा अपमान केला ते सोंगाडे आम्हाला विचारतात, घोंगड्या खाली काय? आठवा निवडणुकीत किती ठिकाणी तुमचे झाले खाली डोके वरती पाय.’ ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकावे म्हणून भाजप सरकारचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ उपसमिती हा त्यांतील एक पाऊल. आहे असे शेलार म्ह़टेल आहे.
COMMENTS